Product Description
ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात मुख्याध्यापक, शिक्षक यांची मोठी भूमिका असते. मुलांना शिकायची गोडी त्यांच्यामुळे लागते. १९५४ ते १९५९ च्या दरम्यान खेडोपाडी शिक्षणाचा गंध पोचला नव्हता. एखादी प्राथमिक शाळा, एक-दोन शिक्षक अशी परिस्थिती होती. पण शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलासारखे वागवत होते. त्यांनी शिकून मोठे व्हावे, अशी तळमळ वाटत असे. हुशार मुलांना ते मदत करण्यास तत्पर असत. जातीपातीचा भेद बाळगण्याच्या त्या काळात मुलांमध्ये कोणताही भेदभाव न करता शिकविणारे ब्राम्हण शिक्षक बहुजन समाजातील मुलाला शिकवितात. त्याच्या पुढील शिक्षणाची सोय करतात, याचे चित्रण ‘उंबरठ्यावरचे दिवस’मधून भाऊ गावंडे यांनी केले आहे. ग्रामीण जीवन, तेथील जातीपातीचे, संबंध, सामाजिक, आर्थिक व्यवहार यातून लक्षात येतात.
Reviews
There are no reviews yet.