Product Description
लोकसत्ता मधील स्तंभामुळे प्रवीण बर्दापूरकर हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. नंतर हाच स्तंभ बर्दापूरकरांनी “लोकप्रभा” साठी लिहिला त्यावर आधारित हे पुस्तक. मराठवाड्याच्या दूरच्या मागास खेड्यात दारिद्र्याचे चटके सोसून मिळतील ती कष्टाची कामे करीत, रोजगार हमी योजनेवर खडी फोडत विधवा आईच्या पाठिंब्याने शिक्षण घेत आंतरिक ओढीने पत्रकारितेत शिरले. विविध वृत्तपत्रांमधून पणजी-चिपळूणपासून ते पुणे, औरंगाबाद , नागपूर इत्यादी ठिकाणी काम करून त्यांनी लोकसत्ता दैनिकाचे नागपूरचे शहर मुख्य वार्ताहर, मुख्य संपादक व स्थानिक संपादक अशी मजल मारली. तीन दशकाच्या पत्रकारितेच्या आयुष्यातील अनुभव “नोंदी डायरीनंतरच्या” या पुस्तकात संकलित केल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.