Product Description
…परस्परांशी निगडीत असलेल्या त्या जीवनगाथा व्यासांनी अशा काही रचल्या आहेत की,त्या वाचताना त्यातली कथापात्रे तुमच्या-आमच्यासारखी खरी माणसे वाटू लागलात. त्यांची मने कळू लागतात. त्यांच्यामधले माया, मैत्री व निष्ठा; द्वेष, सूड व द्रोह; हे सारे भाव उमगू लागतात. आणि मग, व्यासांच्या कथापत्रांचे रागलोभ, हर्षखेद, आशानिराशा, मानपान, यशाचे उन्माद आणि अपयशाचे दाह, हे सारे आपल्याला अशा काही आवेगाने येऊन भिडते की, आपण एक प्राचीन कथा वाचतो आहोत ह्याचे भान सुटल्यासारखे… …तिकडे द्रोण आपल्या उत्तराची वाट पाहत आहेत, हे युधिष्ठिराला जाणवते आहे. पण, त्यांना ‘हत:’ सांगायचे की ‘अहत:’ ? जयासाठी सत्याला तिलांजली द्यायची ?… सत्याचा आग्रह धरून पराजय पदरी घ्यायचा? … ‘हत:’ की ‘अहत:’ ? … जय की पराजय? … युधिष्ठिराच्या मनात परस्परविरोधी विचारांचे हे असे द्वंद्व चालू असताना, द्रोणांवर कृष्णाचा ‘योग’ कसा करावा ह्याविषयी त्याला एक नामी युक्ती सुचते… हत्ती! तो हत्ती! भीमसेनाचा तो हत्ती !!
Reviews
There are no reviews yet.