Product Description
ही कथा आहे लुपससारख्या एका असाध्य आजाराशी जवळजवळ २० वर्षे दिलेल्या लढ्याशी. या लढ्याचे साधर्म्य मालभारतातील युद्धाशी आहे. महाभारत युद्ध जसे आप्तस्वकीयांविरुद्ध होते, तसेच माझेही युद्ध आपल्याच रोगप्रतिकारक शक्तींविरुद्ध आहे. आपल्याच शरीराने आपल्यावर केलेले हल्ले परतविण्याचे सतत चालणारे युद्ध! महाभारत कथेप्रमाणे या आजाराचे स्वरूप व्यामिश्र, अनेक पदरी. महाभारतात जसे अनेक प्रवृत्तीचे दर्शन होते तसेच हा आजारही प्रत्येकवेळी बहुविध रूपे दाखवितो. त्याच्या बहुरूपी असण्यामुळे एक प्रकारचा चकवा निर्माण होतो. त्या-त्या वेळची लढाई जिकली तरी हानी आपलीच. आणि संपूर्ण युद्धाचा शेवट कसा, कधी, काय होणार हे अनिश्चित!
Reviews
There are no reviews yet.