Product Description
अंजली कुलकर्णी यांची कविता ऐकतानता आणि अलिप्तता या दोहोंचा प्रत्यय देते. मुक्तिधास ही या कवितेची नैतिक शक्ती आहे. ही मुक्ती म्हणजे अमुक एका गोष्टीपासूनची मुक्तता नव्हे, तर मुक्त असल्याची जाणीव सत्त्वाप्रमाणे अंतरात वसत राहण्याची अवस्था. आदिम वृत्तींचा पगडा आणि संस्कृतीच्या नावाखाली निर्माण होणारा पाळीवपणा या दोन्ही गोष्टींना तिथे स्थान नसते. ही अवस्था नीट जाणून घेणे आणि तिथपर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न करणे हे इवल्याशा बिंदूवर अख्ख्या जीवाचा तोल सांभाळण्यासारखे आहे. या अनुभवकेंद्रामुळे भावनिक, वैचारिक आणि अध्यात्मिक ताणांची त्रिवेणी या कवितांमधून उद्भवते.
Reviews
There are no reviews yet.