पुस्तक प्रकाशन 2022

प्रतीभांगण “गप्पा”

ग्रंथाली आणि मराठी विज्ञान परिषद
यांच्या संयुक्त विद्यमाने
प्रतीभांगण “गप्पा”
डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याशी
संवादक : श्री. अ. पां. देशपांडे

सृष्टीतील मुलतत्वांचे रहस्य शोधून काढण्यासाठी
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील सर्न या संस्थेत
लार्ज हॅड्रॉन कोलायडर या प्रकल्पात ‘हिंग्ज बोसॉन पार्टिकल’
यावर गेली अनेक वर्षे संशोधन चालू आहे. येथे जगातील
८५ देशांतील सुमारे ७००० शास्त्रज्ञ काम करीत आहेत. त्यात
भारतातील बीएआरसी, टीआयएफआर, राजा रामण्णा सेंटर,
पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठ यांचाही सहभाग आहे.
या प्रकल्पातील एक शास्त्रज्ञ
डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम
गुरुवार, ३० जून २०२२ रोजी सायं. ६ वाजता,

ग्रंथाली प्रतीभांगण, आयडेंटिटी बिल्डींग, केन रोड,
मन्नत बंगल्याजवळ, बॅडस्टॅड, वांद्रे (पश्चिम) मुंबई येथे
आयोजित करण्यात आला आहे.


‘ग्रंथाली प्रतिभांगण गप्पा’मध्ये सुप्रसिद्ध संशोधक व शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष कोतवाल यांची मुलाखत
फ्रान्स-स्वित्झर्लंड सीमेवर असलेल्या सर्न या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘लार्ज हायड्रोजन कोलायडर’
या महत्त्वपूर्ण प्रकल्पात मोलाची भूमिका निभावणारे व संशोधनाच्या जोडीनेच अमेरिकेतील ड्युक विद्यापीठात विद्यादानाचे काम करणारे डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम गुरुवार, 30 जून 2022 रोजी झाला.
ग्रंथालीच्या वांद्रे येथील प्रतिभांगण या वास्तूमध्ये मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात डॉ. कोतवाल यांना अ.पां. देशपांडे यांनी बोलते केले. जगभरातील शेकडो देशांतील 7000हून अधिक शास्त्रज्ञ सहभागी असलेल्या या प्रकल्पामागची संकल्पना,
त्यात होणारे संशोधन याविषयी डॉ. कोतवाल यांनी पडद्यावरील आकृत्यांच्या साहाय्याने सोप्या भाषेमध्ये माहिती दिली. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, अन्य पदाधिकारी, तसेच विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवर यावेळी उपस्थित होते.