दोन वर्षाचा आढावा

‘ग्रंथाली’चे संस्थापक-सदस्य आणि ज्येष्ठ लेखक अरुण साधू हे नावाजलेले पत्रकारदेखील होते. अनेक वर्षे वेगवेगळ्या इंग्रजी दैनिकांत वरिष्ठ पदांवर त्यांनी लक्षणीय काम केले. त्यानंतर अचानक साधू यांचा शिक्षणक्षेत्रात प्रवेश झाला त्याचे श्रेय शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांना द्यायला हवे. 1994-95च्या सुमाराला पुणे विद्यापीठाच्या (आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) कुलगुरूपदी आल्यानंतर गोवारीकर यांनी पत्रकारितेचे शिक्षण अधिक अर्थपूर्ण, व्यवसायाला अनुरूप व त्याच्या गरजा योग्य प्रकारे पूर्ण करणारे व्हावे यासाठी साधू यांना संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात प्राध्यापक म्हणून निमंत्रित केले. 1996 ते 2001 या काळात साधूंनी या विभागात अनेक नवनवे प्रयोग केले. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ते पाहिले. त्यामुळे या विभागाचे नाव सर्वत्र अधिक आदराने घेतले जाऊ लागले. रानडे इन्स्टिट्यूट या नावाने ओळखला जाणारा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग साधूंची लोकप्रियता आणि त्यांचा थोरामोठ्यांशी असलेला संपर्क यामुळे अधिकच प्रसिद्ध झाला. साधूंच्या निधनानंतर त्यांच्या स्मृत्यर्थ एखादा कायम स्वरूपी उपक्रम करण्याची सर्व शिक्षकांची इच्छा होती. त्याच सुमारास कुमार केतकर, अरुणा साधू यांच्याशी माझा आणि विभागातल्या सहकार्‍यांचा संपर्क झाला. त्यांच्याही मनात साधूंचे व्यक्तिमत्त्व, लौकिक, अभ्यासविषय यांच्याशी सुसंगत असा उपक्रम करण्याचे विचार चालू होते. साधू जरी विभागात प्राध्यापक असले तरी फक्त विभागासाठी किंवा विभागातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम न करता राज्यव्यापी उपक्रम करावा, साधू जसे समकालीन घडामोडींचा धांडोळा घेऊन त्यांविषयी सखोल लेखन करत तसे

लेखन करण्यासाठी उत्तेजन देणारा उपक्रम असावा असे आमच्या चर्चेतून पुढे आले. तरुण पत्रकारांना त्यांच्या आवडीच्या विषयांचा पाठपुरावा  करण्यासाठी साह्य मिळाले तर त्यातून चांगले अभ्यासू पत्रकार, लेखक तयार होतील या मुद्यावर आमचे एकमत झाले. उपक्रमासाठी लागणारा निधी साधू कुटुंबीय आणि मित्रपरिवार उभा करेल, ‘ग्रंथाली’ त्या निधीचे आर्थिक नियोजन करेल, व आमचा विभाग उपक्रमाची आखणी आणि अमंलबजावणी करले अस ेत्यातनू ठरले. दरवर्षी साधू यांच्या स्मृतिदिनाच्या आसपास पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित पत्रकाराचे व्याख्यान आयोजित करावे, व त्या व्याख्यानात पाठ्यवृत्ती विजेत्यांच्या नावांची घोषणा करावी असेही ठरवण्यात आले. साधूंच्या मृत्यूनंतरच्या त्यांच्या पहिल्या जन्मदिनी त्यांच्याच झिपर्‍या या कादंबरीवर निघालेल्या चित्रपटाच्या पुण्यातील खास खेळाच्या वेळी शरद पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अरुण साधू पाठ्यवृत्तीची घोषणा करण्यात आली. त्यानंतरच्या दोन महिन्यांत अर्ज मागवण्यात आले. पाठ्यवृत्तीचे पहिलेच वर्ष असूनही राज्यभरातून एकोणीस तरुण पत्रकारांनी त्यांचे संशोधन प्रस्ताव पाठवले होते. त्यांतील विषयांची विविधता थक्क करणारी होती. तरुण पत्रकार दैनंदिन कामाच्या जोडीला आपापल्या आवडीच्या विषयांवर काम करत आहेत हे पाहून आपण पाठ्यवृत्ती सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता याविषयी आमची खात्री पटली. प्रस्तावांची प्राथमिक छाननी करून, त्यांचे मूल्यमापन करून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन सुयोग्य उमेदवार निवडणे हे मोठे काम होते. त्यात ज्येष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत पाटील आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुहास पळशीकर यांची मदत झाली. साधूंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित

करण्यात आलेल्या सिद्धार्थ भाटिया यांच्या अरुण साधू स्मृती व्याख्यानाच्या वेळी – 28 सप्टेंबर 2018 रोजी – दै. लोकमतच्या नाशिक आवत्त्ृाीत काम करणार्‍या पत्रकार मघेना ढाकेे याचीं पहिल्या पाठ्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली. आसाममधल्या माणसांचा संघर्ष त्यांना अभ्यासायचा होता. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीमुळे होरपळून निघणार्‍या सामान्य माणसांचे आयुष्य कसे आहे, आपण भारतीय आहोत याचा पुरावा द्यावा लागणे त्यांच्यासाठी किती यातनामय आहे, हा संघर्ष खरा कसा आहे-आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक, धार्मिक की भाषिक हे जाणून घेण्यासाठी मेघना ढोके यांनी आसामच्या विविध भागांना भेटी दिल्या. त्यांच्या वर्षभराच्या अभ्यासातून हाती आलेला तपशील, त्याचे विश्‍लेषण आणि त्यावरून निघणारे निष्कर्ष यांच्या आधारे पुस्तक लिहिण्याचे त्यांचे काम आता पूर्ण होत आले आहे. ते ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित होण्याची शक्यता आहे. ‘मला या विषयात रस असला, माझ्या परीने मी त्याचा अभ्यास करत असले तरी पाठ्यवृत्तीमुळे त्या कामाला दिशा, आर्थिक साह्य आणि सन्मान मिळाला’ अशी मेघना ढोके यांची भावना आहे. या वर्षीदेखील पाठ्यवृत्तीची घोषणा जून महिन्यात करण्यात

आली. राज्यभरातून पंधरा प्रस्ताव आले. ज्यांनी गेल्या वर्षी प्रस्ताव पाठवले होते, पण ज्यांची निवड झाली होती अशानींदखेील प्रस्ताव पाठवले हे विशेष. ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे आणि प्राध्यापकलेखक जयदेव डोळे यांनी प्रस्तावांचे परीक्षण केले. ज्या चार प्रस्तावांचा अंतिम फ ेरीत विचार करण्यात आला, त्यांपैकी दोन विषयांच्या अभ्यासाची निकड, प्रस्ताव

सादर करणार्‍या पत्रकारांचे त्या संबंधातील आधीचे काम, व अभ्यासाचे नियोजन समान दर्जाचे वाटल्याने दोघांना विभागून पाठ्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यांतील गोवंशाचा तुलनात्मक अभ्यास करावयाचा आहे. त्यासाठी पुरेसा वेळ देण्याची माझी तयारी होती मात्र, पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याने मला

अभ्यास करता येत नव्हता. या कायद्याचा अभ्यास करून हा कायदा शेतकर्‍यांसाठी कसा अन्यायकारक आहे हे मला पाहायचे आहे. त्यासाठी मला या फेलोशिपचा उपयोग होणार आहे,’ असे दत्ता जाधव यांना वाटते. पाठ्यवृत्तीची निवडप्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे आणि बहुतांश प्रक्रिया ऑनलाइन होत असल्याने वेळ आणि पैसा वाचतो.

अरुण साधू पाठ्यवृत्ती योजना

पाठ्यवृत्ती दीड लाख रुपये (एका पत्रकारासाठी किंवा दोन पत्रकारांना समान विभागून) मराठीतून लिहिणार्‍या, किमान तीन वर्षांचा अनुभव असलेल्या पत्रकारांसाठी, वयोमर्यादा 45 वर्षे. प्रस्ताव पाठवण्याचा कालावधी – 1 जुलै ते 15 ऑगस्ट (हशरव.वलक्षसारळश्रऽलेाया पत्त्यावर) निवडप्रक्रिया – लेखी प्रस्तावांच्या मूल्यमापनानंतर चार सर्वोत्तम प्रस्ताव पाठवणार्‍या पत्रकारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येतील, व त्यातून अंतिम विजेत्यांची निवड केली जाईल. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात स्मृतिव्याख्यानात पाठ्यवृत्ती विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.

असेही त्यांचे मत आहे. जाधव यांच्याबरोबरच मुक्ता चैतन्य यांचीही पाठ्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. त्या मुक्त पत्रकार म्हणून काम करतात. समाज- माध्यमे, डिजिटल तंत्रज्ञान यांविषयी त्या विपुल लिखाण करतात. ‘गेमिंग आणि पॉर्नचे मुलांवर होणारे परिणाम’ हा विषय आताच्या काळात समजून घेणे फार गरजेचे आहे या विचारातून त्यांनी त्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी पाठ्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. ‘अरुण साधू अभ्यास पाठ्यवृत्तीसाठी

माझ्या विषयाची निवड झाली हा मी माठेा सन्मान मानत.े  फेलोशिपच्या निमित्ताने पत्रकार म्हणून माझा नव्याने प्रवास सुरू झाला आहे. जो मला पत्रकार म्हणून अधिक सजग करणारा आहे. प्रस्ताव पाठवल्यानंतर अंतिम मुलाखतीची फेरी अतिशय महत्त्वाची आणि कसाटेी बघणारी हातेी. विषयाची तयारी आणि माझा आवाका या दोन्हीची परीक्षा त्यात झाली,’ अशी त्यांचीही भावना आहे. यावर्षी एमजीएम संस्थेच्या सहकार्याने औरंगाबादमध्ये झालेल्या अरुण साधू स्मृती व्याख्यानात वरील दोघांच्या नावांची घोषणा करण्यात आली. व्याख्यानाच ेप्रमखु वक्त ेराजदीप सरदेसाई यांच्या हस्ते दोघांचा सत्कारही करण्यात आला. कुमार केतकर हे अन्य वक्ते होते. एमजीएम संस्थेचे अध्यक्ष ए.एन. कदम यावळेी उपस्थित हाते.े एमजीएम कालॅजेच्या प्रिन्सिपालॅ रखेा शळेके यांनी एकूण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. मेघना ढोके यांनी त्यांच्या आसामबद्दलच्या अभ्यासाचे सादरीकरणही या कार्यक्रमात केले. पुढच्या सप्टेंबरपर्यंत जाधव आणि चैतन्य या दोघांचे अभ्यास पूर्ण होतील. तोवर नव्या पाठ्यवृत्ती विजेत्यांची घोषणा झालेली असेल. अशा रीतीने दरवर्षी नवनवे विषय अभ्यासले जातील. उत्तरोत्तर अधिकाधिक तरुण पत्रकार या संधीचा लाभ घेतील अशी आशा करायला हरकत नाही.

अरुण साधू पाठ्यवृत्ती

ख्यातनाम लेखक व पत्रकार अरुण साधू यांचे २०१७ साली सप्टेबर महिन्यात निधन झाले . ‘ग्रंथाली’चे संस्थापक विश्वस्थ

असलेल्या अरुण साधू यांनी पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागा’चे प्रमुख म्हणून कामगिरी निभावली त्यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ ‘ग्रंथाली’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांच्या संज्ञाकडून आणि वृत्तपत्रविद्या विभाग’ यांच्या सहकार्याने दरवर्षी तरुण पत्रकारास सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करण्यासाठी पाठ्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी आलेल्या अर्जांवर विद्यापीठातर्फे छाननी व मुलाखत होऊन पाठ्यवृत्तीसाठी उमेदवार निवडला जातो. या उमेदवाराने जाहीर झाल्यापासून एकवर्षात साधू स्मृतिदिनी, आपले लिखाण पूर्ण करून विद्यापीठास सादर करायचे, असे त्याचे स्वरूप असते. ही पाठ्यवृत्ती देण्याचा समारंभ, आयोजित करणे, वक्ते ठरवणे आणि पाठ्यवृत्तीची रक्कम निवडलेल्या उमेद्वारास देणे, ही बाजू ग्रंथाली पाहते.

  • २७ सप्टेंबर २०१६ रोजी प्रथम पाठ्यवृत्ती प्रदान कार्यक्रम पुणे येथे झाला. या कार्यक्रमात ‘द वायर’ चे संस्थापक आणि संपादक सिद्धार्थ भाटिया यांचे भाषण झाले. मेघना डोके यांना पाठ्यवृत्ती प्रदान केली गेली.
  • २८ सप्टेंबर २०१९ रोजी औरंगाबाद येथे पाठ्यवृत्ती प्रदान करण्याचा दुसरा समारंभ पार पडला महात्मागांधी मेमोरिअल यांच्या औरंगाबाद सहयोगाने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राजदीप सरदेसाई यांनी आपले विचार मांडले मागील वर्षीच्या पाठ्यवृत्ती धारक मेघना डोके यांना अनुभव कथन केले, तर मुक्ता चैतन्य व दत्तत्रय जाधव या दोघांना या वर्षी पाठ्यवृत्ती प्रदान करण्यात आली.