चांगदेव काळे – अल्पपरिचय
साहित्यिक : प्रकाशित झालेली पुस्तके
कादंबरी : आशाळभूत , सुभेदार, नूरजहान, खुदराई, राखुळी, वेदीवर.
कथासंग्रह : मदत, आता काय करायचं, गंध आणि काटे.
चरित्र : शतकयोगी , ध्यासपर्व.
वाडवळी शब्दकोश : डॉ. अनंत देशमुख यांच्या सोबत सहसंपादन .
याशिवाय ग्रंथ परीक्षण, दिवाळी अंक संपादन आणि विविध नियतकालिकात लेखन
ठाणे येथे १९८८ यावर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या बासष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात सहभाग.
मराठी ग्रंथ संग्रहालयाने २०१० यावर्षी आयोजित केलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात कार्यवाह म्हणून सहभागी.
संस्थात्मक :
साने गुरुजी वाचनालय, संस्थापक सदस्य आणि कार्यवाह,
साधना विद्या मंदिर संस्थापक सदस्य ,
मराठी ग्रंथसंग्रहालय, कार्यवाह,
ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ, अध्यक्ष,
कोकण विभाग ग्रंथालय संघ, उपाध्यक्ष,
महाराष्ट्र साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखा, कार्यवाह.
कामगार चळवळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी मधील ‘ इंटक ‘ या कामगार संघटनेचा राज्यस्तरीय संघटन सचिव .
कामगार शिक्षक.
नाट्यचळवळ :
‘अंत आता पाहता’ या नाटकाचे लेखन व राज्य नाट्य स्पर्धेत सादरीकरण.
राज्यस्तरीय आंतरविभागीय नाट्यस्पर्धेत ‘नेपथ्य ‘ ही बाजू तीस वर्ष सांभाळली. यात अनेक पुरस्कार प्राप्त.
पुरस्कार :
‘गुणवंत कामगार’ राज्य शासनाचा पुरस्कार.
साहित्य संघ, मुंबई, मंगेश कुलकर्णी पुरस्कार,
मराठी ग्रंथ संग्रहालयाचा वा अ रेगे साहित्य पुरस्कार
नाट्यदर्पण आणि कलासंगम यांचे नाट्य पुरस्कार.
प्रसाद बन राज्यस्तरीय ग्रंथगौरव पुरस्कार
गुणीजन पुरस्कार ठाणे महानगरपालिका
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सेवा. आता निवृत्त.