दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणार्‍या पद्मश्री दया पवार स्मृतिपुरस्काराने लेखिका मेघना पेठे, मल्लिका अमरशेख आणि सामाजिक कार्यकर्त्या, शाहीर शीतल साठे यांना सन्मानित करण्यात आले. यंदा या पुरस्काराचे 13 वे वर्ष आहे. मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या सभागृहात साहित्यक्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते हा पुरस्कारसोहळा पार पडला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबेंनी वर्तमान परिस्थितीवर फटकारे ओढले.  ‘चाळीस वर्षांपूर्वी बलुत्यानं जातीचा, कमीपणाचा न्यूनगंड संपवला. म्हणून अनेकजण लिहिते झाले आणि मराठी साहित्य विस्तारत गेले,’ असे कसबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले. ‘शासकीय कामकाजातून ‘दलित’ हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हा शब्द आता नकारात्मक राहिलेला नसून या शब्दाने मोठी चळवळ उभी केलेली आहे. ती सहजासहजी संपवू देणार नाही,’ असा निर्धार प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या प्रास्ताविक

भाषणातून केला. यावेळी ज्येष्ठ हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मिकी लिखित ‘जूठन’ या आत्मकथनाच्या ‘उष्टं’ या मराठी अनुवादासाठी डॉ. मंगेश बनसोड यांना ‘ग्रंथाली’तर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘बलुतं’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हरिश्‍चंद्र थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोमैया कॉलेजच्या प्राचार्य वीणा सानेकर, दत्ता बाळसराफ यांनी सूत्रसंचालन केले.

दरवर्षी प्रकाशित होणार्‍या दलित आत्मकथनातून निवड केलेल्या एका आत्मकथनास ‘ग्रंथाली’तर्फे ‘बलुतं’ पुरस्कार दिला जातो.

‘समाजातील सर्वच क्षेत्रात जे जे घडतंय ते अभ्यासून लोकांपर्यंत पोचवणे म्हणजे पत्रकारिता होय. भाषेवर प्रभुत्व, चौफेर ज्ञान, घड्याळाकडे न बघता काम करण्याची वृत्ती पत्रकारांमध्ये असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली व्यक्तिगत मते कधीही बातमीत डोकावता कामा नयेत. पत्रकारितेच्या जगातील वाढत्या वेगामुळे आणि ‘तातडी’मुळे बातम्यांमध्ये चुका होत असतात. त्या टाळण्यासाठी पत्रकारांनी आपला व्यासंग वाढवणे, बातमीतील तपशिलांची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे.’ असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि प्रथितयश लेखिका संजीवनी खेर यांनी व्यक्त केले. सन 2019 सालचा ‘ज्येष्ठ पत्रकार  कै. वसंतराव उपाध्ये सृजनशील पत्रकारिता पुरस्कार’ त्यांना मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ प्राध्यापिका आणि लेखिका डॉ. मनीषा टिकेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चेंबूर एज्युकेशन सासेायटी आणि बाल विकास सघं याच्ंया सयंक्ुत विद्यमान ेआयािेजत या कार्यक्रमात आपल्या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पत्रकारिता हे लोकांना शहाणे करून सोडणारे माध्यम आहे, या एका ध्यासाने, कोणत्याही पदाचा मोह न बाळगता तहहयात प्रामाणिक पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार कै. वसंतराव उपाध्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ, व्यासंगी आणि सृजनशील लेखन करणार्‍या पत्रकाराला दिला जातो. पुरस्काराचे हे यंदाचे चौथे वर्ष आहे. ‘लोकसत्ते’पासून ‘लोकप्रभा’पर्यंत संपादकीय वाटचाल

केलेल्या ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर यांनी साहित्यक्षेत्रातही आपली छाप उमटवलेली आहे. त्यांच्या ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या, नोबेल साहित्यिक, सर्वसाक्षी, जलसूक्त, चित्रकथी, संभाजी या पुस्तकांसह सहा-सात कादंबर्‍या, दोन कथासंग्रह, चार ते पाच अनुवाद प्रकशित झाले असून इतिहास संशोधनक्षेत्रातदेखील विविध डॉक्युमेंटरीज बनवून त्यांनी मोलाची भर घातली आहे. अशा प्रकारे सर्वार्थाने बहुअंगी अशा व्यक्तिमत्त्वाचा सृजनशील पत्रकार म्हणून गौरव न होता तरच नवल! व्युत्पन्न पत्रकार अरुण टिकेकर यांच्या पत्नी इतकीच ओळख न राखता वाचकाच्ं या कायम स्मरणात राहील अस ेव्यासगं ी वत्त्ृ ापत्रीय  लेखन करणार्‍या प्रा. डॉ. मनीषा टिकेकर या गेली एकेचाळीस वर्षे लाला लजपतराय महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या शेजारी देशांतील राज्यव्यवस्था, अंतर्गत घडामोडी, त्यांचा भारतावर होणारा परिणाम या विषयावर ‘भारत आणि भारताचे शेजारी’ तसेच ‘कुंपणापलीकडचा देश पाकिस्तान’ असे ग्रंथलेखनही केले आहे. ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. मनीषा टिकेकर यांनी तर सध्याच्या पत्रकारितेच्या व्यवसायाचे  ढळढळीत वास्तव आपल्या भाषणात मांडले. पत्रकारिता या क्षेत्राला विनाकारण ग्लॅमर प्राप्त झालेय. इतर व्यवसायांप्रमाणेच या व्यवसायातदेखील बदल होणे क्रमप्राप्त आहे, मात्र या व्यवसायात आवश्यक असणारा प्रामाणिकपणा, ठोसपणा, वैचारिक डूब या नीतिमूल्यांचा र्‍हास होत चालला असून

सध्या दृक्श्राव्य माध्यमातील मुलाखतींमध्ये आलेला उथळपणा, उडत्या भाषेचा मोह, वृत्तपत्रांवरील दिवसागणीक वाढत चाललेली जाहिरातींच्या जॅकेट्सची संख्या या सर्वच गोष्टींचा विषाद वाटतो, असे त्या म्हणाल्या. ग्लोबलाइज्ड भाषा वापरताना, विशेष नावे देताना सर्रास चुका केल्या जातात. मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषांचा वापर करताना तारतम्य बाळगणे, चौफेर वाचन करणे, संतुलित दृष्टिकोन ठेवणे, टीका करतानादेखील पातळी राखणे आज खूप आवश्यक झाले आहे. सध्याच्या युवकयुवतींना पत्रकारितेचे शिक्षण डोळसपणे देणे, समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे या, शब्दांत त्यांनी या कार्यक्रमासाठी जमलेल्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आणि  रसिक प्रेक्षकांना मार्गदर्शन केले. ‘शारदीय नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून या कार्यक्रमात एका सरस्वतीच्या हातून दुसर्‍या सरस्वतीचा सन्मान होतो आहे, याचा मनापासून आनंद होत आहे. तसेच, दैनंदिन लेखनकार्यासोबतच

नवनवीन सृजनशील उपक्रमांमध्ये पत्रकाराने स्वतःला गुंतवून घेऊन समाजमनाची मशागत केली पाहिजे’, असे ज्येष्ठ पत्रकार, मुंबई विद्यापीठाच्या गरवारे पत्रकारिता वर्गाच्या मुख्य समन्वयक आणि कै. वसंतराव उपाध्ये यांच्या पत्नी नीला उपाध्ये यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी कै. वसतंराव उपाध्य ेयाच्ंया आठवणींना उजाळा दिला. कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी चबेंरू एज्यकुेशन सासेायटीच ेअध्यक्ष अविनाशजी ताबें होते. बालविकास संघाच्या वतीने अमित आपटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर प्रा. आर्या आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पत्रकारिताक्षेत्राचा लेखाजोखा मांडत व्यासंगी वक्त्यांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या सान्निध्यात हा सृजनाचा सोहळा रंगला.

शब्दांकन – नम्रता कडू