ग्रंथाली प्रतीभांगण गप्पा – डॉ. अविनाश सुपे आणि डॉ. सतीश नाईक यांच्याशी…
संवाद साधतील वैशाली रोडे
आरोग्य हा विषय आपल्या प्रत्येकाच्या जीवनात किती महत्वाचा आहे हे गेल्या दोन वर्षात सर्वाना समजले आहे
विविध आजार, त्यांची कारणे, उपचार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निरोगी राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व योग्य जीवनशैली
या सर्वांसाठी चांगल्या डॉक्टरचेही स्थान आपल्या आयुष्यात अविभाज्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील दोन दिग्गज
डॉक्टरांची पुस्तके ग्रंथालीने नुकतीच प्रकाशित केली.
डॉ. अविनाश सुपे यांच्या ‘सर्जनशील आणि रहा फिट’ या आणि डॉ. सतीश नाईक व डॉ. दुर्गा गाडगीळ यांच्या
‘कॅन्सर – डोक फिरलेल्या पेशी’ या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने डॉ. सुपे व डॉ. नाईक यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम अआयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे आपल्याला हार्दिक निमंत्रण !
गुरुवार, ४ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता,
ग्रंथाली प्रतीभांगण, आयडेंटीटी बिल्डिंग, केन रोड,
मन्नत बंगल्याजवळ, बॅ न्डस्टॅन्ड, वांद्रे (पश्चिम) मुंबई