- कुमारगंधर्व यांची प्रात्याक्षिकांसहित संगीतविषयक सहा भाषणे (मे 1985).
- आशा भोसले, यमुनाबाई वाईकर आदी विविध क्षेत्रांतील नामवंतांशी प्रकट गप्पा.
- ग्रंथमोहोळ सांगता समारंभात पुणे येथे ‘आशय’ व ‘परिचय’च्या सहकार्याने विनोदी चित्रपट महोत्सव.
- प्रभात चित्र मंडळाच्या सहकार्याने गुरुदत्त चित्रपट महोत्सव.
- ‘ग्रंथाली’ने 1990 साली अभ्यासमंडळाच्या काही बैठका घेतल्या. त्यामध्ये कुमार केतकर, वि. गो. कुळकर्णी, राजीव नाईक, जगन फडणीस वगैरेंच्या सहा सभा झाल्या.
- विज्ञानग्रंथालीच्या दर शनिवारच्या गप्पा. अनेक मंडळी येतात. विविध विषयांवर बोलतात. पुरस्कारवितरण, लेखन-प्रोत्साहन आणि प्रदर्शन हे मुख्य उपक्रम.
- कै. वसंत वरखेडकर आस्थेवाईक ग्रंथपाल पुरस्कार – ग्रंथपाल क्षेत्रातील असाधारण कामगिरीबद्दल (रोख १५०० रु.) वरखेडकर कुटुंबियांच्या सहकार्याने.
- पुणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 1999 साली पुणे विद्यापीठांतर्गत महाविद्यालयात ठिकाणी पुस्तक प्रदर्शन आणि विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.
- स्थापत्य अभियंत्यांच्या जीवनावरील ‘काँक्रिटचे किमयागार’ या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने विकास प्रकल्पांवर आधारित ‘काँक्रिट ड्रीम्स’ या प्रदर्शनाचे दादर आणि विलेपार्ले येथे आयोजन करण्यात आले. पर्यायी विकास धोरणांचा मागोवा या विषयाच्या अनुषंगाने मौलिक स्वरूपाचे विचारमंथन घडवून आणणारे चर्चासत्र या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. त्यात अनेक राजकीय नेते, सनदी अधिकारी, अभियंते आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. धरणे, रस्ते, पूल, यांच्या मॉडेल्सचे प्रदर्शन मांडले होते.
- मागील 25 वर्षांतील महिलाविषयक प्रगतीचा विचार आणि त्या अनुषंगाने होणार्या कृतीचा आढावा घेणार्या ‘अर्धे आकाश’ या उपक्रमाचे 2001 साली आयोजन करण्यात आले. मेधा पाटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील पंचवीसहून अधिक नामवंत महिलांनी त्यात सहभाग घेतला. महिलांच्या मुलाखती, चित्रपट तसेच वाहिन्यांवरील निवडक भागाच्या चित्रफिती आणि विविध नाटकांतील निवडक वेच्यांचे या निमित्ताने सादरीकरण करण्यात आले.
- जगभरातील कोणालाही मराठी शिकता यावे यासाठी ‘ग्रंथाली’ने मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘माय मराठी’ ‘पाठ्यपुस्तक’ दोन भागात तयार केले.
- ज्ञानाधिष्ठित प्रगती आणि सरस्वतीच्या उपासनेद्वारे प्रतिष्ठा मिळवत जगभर तळपणार्या 33 अनिवासी मराठी प्रतिभावंतांच्या यशकथांचे दर्शन घडवणाऱ्या ‘गर्जे’‘मराठी’ या ग्रंथाचे दोन भाग प्रकाशित केले.
- बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सर्व अधिवेशनांमध्ये ‘ग्रंथाली’ने सक्रिय सहभाग घेतला आहे. हा सहभाग खर्चीक स्वरूपाचा आणि आतबट्ट्याचा होता, पण त्याचा विचार न करता मराठी भाषेच्या प्रेमापोटी आणि मराठीती उत्तमोत्तम पुस्तके जगभरातील मराठील रसिकांच्या हाती पडावीत या उद्देशाने ‘ग्रंथाली’ने पुढाकार घेऊन हे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर अनिवासी भारतीय मराठी लेखकांच्या संख्येत जी वाढ झाली त्याचे काहीएक श्रेय जरूर ‘ग्रंथाली’च्या वाट्याला येते.
या सार्या उपक्रमांची एक सुंदर परिणती म्हणून ‘प्रतिभांगण’ ही ‘ग्रंथाली’ची नवी शाखा नुकतीच उदयाला आली आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या विविध अंगांना सृजनशील अंगाने स्पर्श करून तिचा नवा आविष्कार घडवणार्या या व्यासपीठाला वांद्रे (बॅण्ड स्टॅण्ड) येथील ‘आयडेण्टिटी’ या इमारतीमध्ये हक्काचे ‘घर’ प्राप्त झाले आहे.
२०२० च्या अखेरीस उद्भवलेल्या कोरोनाच्या जगभर संकटामुळे एकूणच व्यवहार ठप्प झाले. या हि काळात ‘ग्रंथाली’ डिजिटल माध्यमाद्वारा सक्रीय राहिली. साहित्याच्या पारावर हा दोन लेखक व वाचक यांच्या भेटीचा कार्यक्रम घरोघरी राहूनच साकारला दर शुक्रवारी असे त्याचे भाग प्रसारित झाले. सात पुस्तकांची डिजिटल प्रकाशने केली याच डिजिटल माध्यमात भर देत एक लेखक वा एक कवी साहित्य संवादामधून वाचकांशी हितगुज करणार आहे. त्याची सुरवात ,मिर्झा गालिब जयंतीनिमित्त चंद्रशेखर सानेकर यांच्या गझल कार्यक्रमाने झाली. त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली.
श्रमहाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त रोजी ‘ग्रंथाली’पुढील पुस्तके प्रकाशित करणार आहे.
1. मोहरा महाराष्ट्राचा संपादक – रमेश अंधारे
2. मराठी राज्यातील मराठीचे वर्तमान – संपादक श्रीपाद भालचंद्र जोशी
3. विज्ञान-तंत्रज्ञानात हीरकमहोत्सवी महाराष्ट्र-संपादक विवेक पाटकर व हेमचंद्र प्रधान (मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने)