‘हेमोफेलिया’ आजाराविषयी डॉ. ममता मंगलानी यांच्याशी संवाद
ग्रंथाली-प्रतिभांगण आयोजित ‘काहीतरी विशेष’ कार्यक्रममालिकेच्या २१व्या भागात, २२ एप्रिल २०२६ रोजी, लेखिका सुधा हुजूरबाजार-तुंबे यानी डॉ. ममता मंगलानी यांच्याशी ‘हेमोफेलिया’ या विषयावर संवाद साधला. डॉ. ममता या खार पश्चिमेतील सनअॅक्ट इस्पितळातील रक्तरोग, कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाच्या संचालक आहेत.
२१ दिव्यांगांपैकी एक असलेल्या हेमोफेलिया या आजाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी डॉ. ममता यांनी मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितली. त्या मुलाखतीत म्हणाल्या, हेमोफेलिया हा आजार आनुवंशिक असून रक्त घट्ट होण्याशी संबंधित आहे. हेमोफेलिया या आजाराची लक्षणे सांगत, यासाठी कराव्या लागणाऱ्या रक्तचाचण्या, घ्यावायची काळजी; तसेच, कोणत्या गोष्टी कराव्यात-करू नयेत याचीही सवित्सर माहिती डॉ. ममता यांनी दिली. डॉ. ममता मंगलानी यांची ही मुलाखत ग्रंथाली प्रतिभांगण या यूट्युब चॅनेलवर लवकरच पाहता येईल.