मुलाखत

‘साहित्यव्रती’ – अलका भुजबळ यांची मुलाखत

‘साहित्यव्रती’ कार्यक्रमात ‘न्यूज स्टोरी टुडे’च्या प्रकाशक अलका भुजबळ यांची मुलाखत

ग्रंथाली-प्रतिभांगण आयोजित ‘साहित्यव्रती’ कार्यक्रमाच्या सातव्या भागात अलका भुजबळ यांची मुलाखत अश्विनी भोईर यांनी घेतली. अलका भुजबळ या ‘न्यूज स्टोरी टुडे’ या वेबपोर्टलच्या निर्मात्या, न्यूज स्टोरी टुडेच्या प्रकाशक आहेत. तसेच, ‘ओळख’ या यूट्यूब चॅनेलवर त्या विविध मुलाखतीदेखील घेतात. अलका यांनी मुलाखतीत एक प्रकाशक म्हणून साहित्यक्षेत्रात देत असलेल्या योगादानासोबतच लहानपणापासूनचा जीवनप्रवासही उलगडला. घरातील परंपरेच्या चौकटी ओलांडत शिक्षण घेत त्या कशा आत्मनिर्भर झाल्या हे त्यांनी मुलाखतीत सांगितले. कॅन्सर या आजाराशी झुंज देऊन पुन्हा एकदा आयुष्यात कशी भरारी घेतली त्या काळाच्या आणि त्यावर आधारित ‘कॉमा’ या पुस्तकाविषयीच्या आठवणी त्यांनी प्रेक्षकांना सांगितल्या. अलका भुजबळ यांची ही मुलाखत ‘ग्रंथाली प्रतिभांगण’ या यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल.