बाबा आमटे
बाबा आमटे – व्यक्तिमत्व कविता आणि कर्तुत्व – बाळू दुगडूमराव पुस्तकाचे प्रकाशन
आंतरभारती भारत जोडो श्रमसंस्कार छावणी सोमनाथ जि. चंद्रपूर येथे आज माझ्या ग्रंथाली मुंबई यांनी काढलेल्या..
‘बाबा आमटे : व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व’
या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास बाबा आमटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भारतजोडो यात्री प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. अशोक बेलखोडे, दगडू लोमटे हे उपस्थित होते.
या छावणीत कुंटूरच्या साने गुरूजींची धडपडणारी मुले या युवाचळवळीचे कार्यकर्ते मारोतराव कदम, विनोद झुंजारे, शिवाजी आडकिने, गजानन आडकीने, गजानन सुर्यवंशी, बन्शी सुर्यवंशी, प्रल्हाद आडकीने, ओमकार डांगे, अभिनव नोरलावार आदी सहभागी झालो आहोत.
कौस्तुभ आमटे, रवींद्र नलगींटवार आणि आनंदवन परिवाराचे आभार.