मी बहुरूपी
अशोक सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’ या अभिनरप्रवासाच्रा आत्मकथनाचं प्रकाशन
शनिवार, ४ जून २०२२ रोजी ख्यातनाम क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते झालं.
या वेळी दिग्दर्शक राजदत्त आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
मुंबईतल्या मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात अशोक सराफ रांच्रा पंचाहत्तरीतील प्रवेशानिमित्त त्यांना मानवंदना म्हणून
सौमिल क्रिएशनच्रा सुनील भोसले यांनी झी मराठी वाहिनीसाठी साजरा केलेल्या समारंभात हा प्रकाशनसोहळा पार पडला.
ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आणि अरुण जोशी, सारस्वत बँकेचे डाररेक्टर किशोर मासुरकर, एसव्हीसी बँकेचे व्हाइस चेअरमन उदर गुरकर, अल्कॉन एन्टरप्रारझेसचे अनिल खंवटे, मीना कर्णिक, सुभाष सराफ आणि अशोक व निवेदिता सराफ प्रकाशनसमरी उपस्थित होते.
अशोक आणि सुनील गावसकर ही दोघंही ग्रँटरोड रेथील चिखलवाडी परिसरात वाढले. त्यांच्या लहानपणचे अनेक किस्से यावेळी दोघांनी सांगितले. सुनील गावसकर रांनी अशोकबरोबर केलेल्या नाटकांची आठवण काढली, तर अशोक सराफ यांनी सुनीलच्या बालपणच्या फलंदाजीला दाद दिली. “रस्त्यातून चालताना अशोक कसा स्वत:शीच बोलत जाताना दिसत असे, आज मोबाइलच्या ब्लूटूथवर माणसं अशी एकटीच बोलताना दिसतात, म्हणजे अशोकपाशी ती दूरदृष्टी लहानपणापासूनच होती,” “एका नाटकावेळी मला कडकडून भूक लागली होती. मी मरणाला तयार आहे, हे वाक्र ‘मी वरणाला तरार आहे’ असं मी म्हटलं,” अशा खुमासदार वक्तव्यांनी गावसकर रांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
छगन भुजबळ यांनीही अशोक सराफ यांच्याविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यांची निर्मिती असलेल्या दोन चित्रपटांमध्ये अशोक सराफ रांनी मध्यवर्ती भूमिका केलेली आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं आणि आपली अनेक वर्षांची मैत्री असल्याचंही म्हटलं.
‘मी बहुरूपी’ या पुस्तकाला दिग्दर्शक राजदत्त यांची प्रस्तावना आहे. प्रकाशन समारंभात अभिनेता जितेंद्र जोशी यांनी या सुरेख प्रस्तावनेचं वाचन केलं.
अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त झी मराठीनं एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. अशोक यांच्या सिनेमांमधल्या गाण्यांवर वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे, अलका कुबल या त्यांच्या नायिकांनी आणि सिद्धार्थ जाधव यांनी नृत्यं सादर केली. त्यांच्या नाटकांमधले प्रवेश पेश करण्यात आले. सचिन पिळगावकर यांनी एक गाणे सादर केले.
या पुस्तकाचं शब्दांकन केलं आहे पत्रकार मीना कर्णिक यांनी. मुखपृष्ठ आणि आतील सजावट नूतन आसगांवकर यांची आहे, तर अशोक सराफ यांची विशेष छायाचित्रं नितीन चिटणीस यांनी टिपली आहेत.
संगीत नाटकांपासून व्यावसायिक नाटक आणि सिनेमापासून टीव्हीपर्यंतच्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अशोक सराफ यांचा प्रवास, वैयक्तिक आयुष्यात आलेले बरेवाईट अनुभव, भेटलेली माणसं, त्यांच्याकडून कळत-नकळत झालेले संस्कार या सगळ्राबद्दल त्यांनी प्रांजळ कथन पुस्तकामध्ये केलेलं आहे. पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बदलत गेलेल्या नाट्य आणि सिनेसृष्टीचं हे एकप्रकारचं डॉक्युमेंटशन आहे.