पुस्तक प्रकाशन 2022

युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्याची गोष्ट

युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्याची गोष्ट
या पुस्तकाचे प्रकाशन

हस्ते : समारंभाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे

डॉ. प्रमोद चौधरी
(संस्थापक व अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज)

प्रमुख अतिथी : शंतनु दीक्षित
(ग्रुप को- अॉर्डीनेटर, प्रयास एनर्जी ग्रुप, पुणे)

गुरुवार, ९ जून २०२२, सायंकाळी ५ वा.

स्थळ : एम. एम. जोशी, सभागृह, नवी पेठ,
गांजवे चौकाशेजारी, पुणे – ४११०३०


प्रकाशन वृतांत

‘औद्योगिक जगतात संशोधनवृत्ती अंगी असणे गरजेचे’ – डॉ. प्रमोद चौधरी
तंत्रज्ञान आणि प्रश्नांचे स्वरूप सातत्याने बदलत असते.औद्योगिक जगतात काळाच्या बरोबरीने धावायचे असल्यास संशोधनवृत्ती अंगी असणे गरजेचे असते, असे मत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.
‘युक्तीच्या गोष्टी सांगणार्‍यांची गोष्ट’ या पुस्तकाचे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात विषयाच्या खोलात जाऊन संयमित मांडणी करणे आवश्यक असते. मात्र, सध्या या अभ्यासूवृत्तीचा अभाव जाणवतो. व्यवस्थापनक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘युक्तीच्या गोष्टी सांगणार्‍याची गोेष्ट’ हे एक अभ्यासपूर्ण पुस्तक असून, या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा किंवा केस स्टडीमध्ये हे पुस्तक रूपांतरित होऊ शकते का, याचा विचार करायला हवा, अशी अपेक्षा प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना दीक्षित म्हणाले, कोणत्याही प्रश्‍नाला दोन बाजू असल्या, तरी तोडगा एकच असतो. हेच देव यांच्या यशाचे रहस्य आहे. वीज आयोगाच्या स्थापनेनंतर आयोगाची कार्यपद्धती कशी असेल, हे निश्‍चित करण्यामध्ये देव यांचा महत्त्वाचा वाटा होता. विजेची चोरी होते तेथे अधिक भारनियमन करण्याचा नियम त्यांनी केला. वीजदरवाढीसंदर्भात ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे वीजदरवाढीबाबत आंदोलन झाले नाही.
लेखक जयंत देव यांनी त्यांचा अनुभवपट यावेळी मनोगताद्वारे उलगडला. जयंत देव लिखित ‘युक्तीच्या गोष्टी सांगणार्‍यांची गोष्ट’ या पुस्तकातील निवडक भागाचे संज्ञा कुलकर्णी यांनी अभिवाचन केले. मिलिंद बावा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ग्रंथाली विेशस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत भविष्यकालीन योजनांची माहिती दिली.

Back to list