हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पर आधारित उत्तर कर्नाटक का नाट्यसंगीत दस्ताएवज
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पर आधारित उत्तर कर्नाटक का नाट्यसंगीत दस्ताएवज पुस्तक प्रकाशन
” शिवगंधार ” तर्फे प्रतिभावंत गायक पं. शिवानंद पाटील यांचा अकरावा स्मृतिदिन.
अभिजात संगीतातील प्रतिभावंत चतुरस्त्र गायक पं. शिवानंद पाटील यांचा अकरावा स्मृतिदिन
” शिवगंधार ” तर्फे सादर झाला.
या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. २३ एप्रिल २०२२ रोजी, सायं ५.३०वाजता ना .ग.आचार्य आणि दा.कृ.मराठे महाविद्यालय सभागृह, ना.ग.आचार्य रोड,चेंबूर [ पूर्व ], मुंबई येथे मैफल संपन्न झाली.
संगीताच्या मैफलीने कार्यक्रमाचा आरंभ झाला त्यात श्रीमती योजना शिवानंद यांचे गायन आणि पं. निरंजन लेले यांचे सोलो ऑर्गन वादन झाले. धनंजय पुराणिक त्यांना तबला साथसंगत केली. ही संगीताची मैफल वेगळी आणि खूप रंगतदार होती. त्यानंतर गायक पं. शिवानंद पाटील यांच्या दया घना कमला या कन्नड नाट्यसंगीताचा व्हिडियो दाखवला.
पं. शिवानंद पाटील यांना २००१ साली संगीतातील शोधकार्यासाठी केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. विषय होता – हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पर आधारित उत्तर कर्नाटक का नाट्य संगीत !
त्यावेळी शोधकार्याचे हिंदीतील २०० पानी हस्तलिखित आणि कन्नड नाट्य संगीताच्या १३ कॅंसेट त्यांनी केंद्र सरकारला सादर केल्या होत्या. त्यांचे ते शोधकार्य (दस्तावेज़ व गायन ) एका पेनड्राइव्ह वर ट्रान्स्फर निवडक मान्यवर संस्थांना आणि व्यक्तींना शिवगंधार तर्फे प्रदान करण्यात आले.
समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या शोधकार्य दस्तावेजाचे प्रकाशन झाले आणि मान्यवरांना पेन ड्राइव्ह प्रदान करण्यात आले.
या दस्तावेजाचे डिजिटल alignment चे महत्वपूर्ण काम ग्रंथाली प्रकाशनाने केले. तसेच प्रकाशनासाठी त्यांनी एक छापील प्रतही विशेष भेट म्हणून योजना शिवानंद यांना दिली. त्याबद्दल ग्रंथालीचे विशेष आभार !
युनियन बँक ऑफ इंडिया हे या मैफिलीचे प्रमुख प्रायोजक होते.
संगीत आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर या मैफलीस उपस्थित होते. ते खालीलप्रमाणे –
विख्यात न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी सर, रमेश म्हापणकर सर, चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचे शैलेश आचार्य आणि हर्षवर्धन पांडे, निरंजन लेले आणि धनंजय पुराणिक, प्रा. मीनाताई गोखले, माझी न्यायमूर्ती हेमंत गोखले सर, डॉ. मुकुंद कुळे, कर्नाटक संघाचे डॉ. भवानी सर आणि यशोदा शेट्टी, आविष्कारचे रवि सावंत, बसवेश्वर फिलॉसोफिकल कल्चरल सोसायटीचे कुलकर्णी सर, सौ. स्मिता आणि श्री. सुभाष देशपांडे, ग्रंथालीचे अर्चित नागवेकर, चेंबूर साहित्य रसिक मंडळाच्या प्रतिनिधी !
गायक पं. शिवानंद पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनाची मैफल प्रमुख अतिथी विख्यात न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या उपस्थितीत काल शनिवारी यशस्वी झाली.
स्थळ – ना.ग.आचार्य आणि दा.कृ.मराठे कॉलेज सभागृह, चेंबूर.
दिनांक – शनिवार दि. २३ एप्रिल २०२२ मार्च ५.३० वाजता.
उपस्थित मान्यवर आणि मित्र –
डॉ. प्रेमानंद रामाणी सर, रमेश म्हापणकर सर, चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचे शैलेश आचार्य आणि हर्षवर्धन पांडे, कलाकार – निरंजन लेले आणि धनंजय पुराणिक, मीनाताई गोखले, हेमंत गोखले सर, मुकुंद कुळे, कर्नाटक संघाचे डॉ. भवानी सर आणि यशोदा शेट्टी, आविष्कारचे रवि सावंत, बसवेश्वर फिलॉसोफिकल कल्चरल सोसायटीचे कुलकर्णी सर, माझी बहिण आणि मेहुणे सौ. स्मिता आणि श्री. सुभाष देशपांडे, ग्रंथालीचे – अर्चित नागवेकर, सानिका देवधर, स्नेहा ओझा, चेंबूर साहित्य रसिक मंडळाच्या मैत्रिणी, शाम परुळेकर आणि माझी टीम – स्नेहल घवाळी, अजित राउत, आनंद नेवरेकर, आणि sound future चे सुशील !
सहकार्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार !
फोटो सौजन्य – आनंद नेवरेकर
प्रमुख प्रायोजक