पुस्तक प्रकाशन 2022

विवाहसंस्था – संकल्पना आणि संक्रमण आणि हुंकारनाद

ग्रंथाली आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवा शक्ती आणि ठाणे शाखा

अनुराधा नेरुरकर लिखित
विवाहसंस्था
संकल्पना आणि संक्रमण

आणि

हुंकारनाद
कवितासंग्रह

या दोन पुस्तकांचे प्रकाशन

शुभ हस्ते : अध्यक्ष

प्रा. अशोक बागवे
(ज्येष्ठ कवी, गीतकार)

सतीश सोळांकूरकर
(कवी, लेखक)

किरण येले
(कवी, लेखक, नाटककार)

मकरंद जोशी
(साहित्य अभ्यासक)

विशेष उपस्थिती : डॉ. प्रदीप ढवळ
(कार्याध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद)

अभिवाचन : प्रा. दीपा ठाणेकर, रामदास खरे, सुजाता राऊत
सुसंवाद : कीर्ती पाटसकर | आभार : ज्योती कपिले

शनिवार, २ जुलै २०२२ सायंकाळी ५.३० वा.
स्थळ : मराठी ग्रंथ संग्रहालय, पहिला मजला,
सुभाष पथ, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम)


विवाहसंस्था : संकल्पना आणि संक्रमणहुंकारनादया पुस्तकांचे प्रकाशन 

शनिवार, २ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात अनुराधा नेरूरकर यांनी लिहिलेल्या या दोन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखक, कवी किरण येले आणि सिद्धहस्त लेखक, निसर्ग अभ्यासक मकरंद जोशी/उपस्थित होते. सुरुवातीला अन्य वक्ते म्हणून  लेखिका अनुराधा नेरूरकर यांनी या पुस्तकांच्या लेखनामागील विचार मांडले. महेश खरे यांनी ग्रंथालीच्या विविध योजना व उपक्रमांविषयी माहिती दिली.

किरण येले यांनी अतिशय विस्तृतपणे ‘विवाहसंस्था’ या पुस्तकाची समीक्षा व कौतुक केले. भारतीय समाजातील व आदिवासी संस्कृतीमधील विवाहाच्या विविध प्रथांबद्दल सांगून येले यांनी हे पुस्तक म्हणजे विवाहसंस्था या विषयावरील पुस्तकमालिकेतील पहिला भाग ठरेल असे म्हटले. मकरंद जोशी यांनी आपल्या भाषणात ‘विवाहसंस्था’ या पुस्तकाच्या समग्रतेचे व लेखिकेच्या रंजक शैलीचे कौतुक केले. अशोक बागवे यांनी आपल्या मिष्कील शैलीतील भाषणाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. सोशल मीडियावर घाईघाईने व्यक्त होणाऱ्या कवींच्या पार्श्वभूमीवर अनुराधा नेरूरकर यांची संयत कविता जास्त उजवी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

को.म.सा.प. युवाशक्ती आणि ठाणे शाखेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवर व रसिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री कीर्ती पाटसकर यांनी केले.

Back to list