पुस्तक प्रकाशन 2022

लोकमान्य टिळक – एक चिकित्सक अभ्यास

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या
शताब्दीवर्षानिमित्त प्रकाशित
लोकमान्य टिळक
एक चिकित्सक अभ्यास
या पुस्तकाचे प्रकाशन

हस्ते : माननीय कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
प्राध्यापक डॉ. सुहास पेडणेकर

वक्ते : डॉ. स्नेहलता देशमुख, सदस्य,
संचालक मंडळ, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन

पार्ले टिळक विद्यालय आसोसिएशनचे शताब्दीवर्ष आणि
लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दीवर्ष यानिमित्त, पार्ले टिळक विद्यालय
असोसिएशनच्या साठ्ये महाविद्यालयाने आभासी मध्यमाद्वारे खास
व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. त्याचे सूत्र होते – लोकमान्यांचे
जीवन आणि कार्य ! या व्याख्यानमालेत व्यक्त झालेले विचार
अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत या उद्देशाने प्रकाशित केलेल्या या
ग्रंथातील लेख लोकमान्यांचे जीवन, विचार, ध्येय व कार्य यांची
चिकित्सा करणारे आहेत. अभ्यासकांसाठी सदर विषयाच्या इतर
अनेकविधी पैलूंच्या अभ्यासवाटा स्वातंत्र्यपणे शोधण्यासाठी हा ग्रंथ
निश्चितपणे सहाय्यकारी ठरेल.

सोमवार, १ ऑगस्ट २०२२ | सकाळी १० वा.
स्थळ : साठ्ये कॉलेज ऑडिटोरियम, विलेपार्ले