पुस्तक प्रकाशन 2022

डॉ. केदार हर्डीकर यांच्याशी ग्रंथाली प्रतिभांगण ‘गप्पा’

डॉ. केदार हर्डीकर यांच्याशी ग्रंथाली प्रतिभांगण ‘गप्पा’

गणितासारख्या नीरस समजल्या जाणाऱ्या आणि मानसशास्त्रासारख्या गुंतागुंतीच्या विषयांतील सिद्धांतांमधून
काव्यरचनेची स्फूर्ती मिळणं हे जरा अनवटच नाही का ?
अमेरिकेत स्थायिक झालेल्या डॉ. केदार हर्डीकर
यांच्या
साहित्यप्रवास असा अनवटच आहे. ‘सामन’ हा पहिला मराठी काव्यसंग्रह
‘Abstract Intersection A Poetic Journey through mathematics’ हे
आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त इंग्रजी प्रकाशन आणि आता पुन्हा,
‘सकेडा’ हा ग्रंथाली प्रकाशित करत असलेल्या काव्यसंग्रहातील त्यांनी गणिती काव्य मराठी वाचकांसमोर
सादर केली आहेत.

अशा या आगळ्या व्यक्तिमत्वाची अनौपचारिक गप्पांची मैफल
शुक्रवार दि. २७ मे २०२२ रोजी
सायंकाळी ५.३० वाजता.

ग्रंथाली प्रतिभांगण, आयडेंटीटी बिल्डिंग बी. जे. रोड,
मन्नत बंगल्याजवळ, बँडस्टँन्ड, वांद्रे (पश्चिम) मुंबई येथे
आयोजित करण्यात आली आहे.
केवळ मोजक्या निमंत्रितांसाठी असलेल्या कार्यक्रमात तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Back to list