पुस्तक प्रकाशन 2022

साहित्य, संवाद, समिक्षा पुस्तक प्रकाशन

प्र. ना. परांजपे लिखित साहित्य, संवाद, समिक्षा पुस्तक प्रकाशन

शुक्रवार दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रंथाली प्रतिभांगण गप्पा या उपक्रमामध्ये
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रभाकर भिडे यांच्या पुस्तकाविषयीच्या प्रास्ताविकानंतर ज्येष्ठ लेखक प्र. ना. परांजपे यांच्या साहित्य, संवाद, समिक्षा या पुस्तकाचे कॅप्टन गोगटे यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.

प्र. ना. परांजपे, कॅप्टन गोगटे, मीना गोगटे, प्रल्हाद जाधव यांच्याबरोबर पुस्तकाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पूर्णा धर्माधिकारी यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.