सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी ‘ग्रंथाली लिसन’ या नव्या पावलाचा शुभारंभ !
केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांमध्ये वाचन संस्कृती जपण्यासाठी ग्रंथाली द्वारा अनेक वेगवेगळे उपक्रम व योजना आखण्यात येतात.
‘ग्रंथाली वॉच’ या यु ट्युब चॅनलवर साहित्य विषयक विविध उपक्रम व कार्यक्रम करण्यात येतात.
यातच आता ‘ग्रंथाली लिसन’ या श्राव्य उपक्रमाची भर पडली आहे.
सोमवार, ८ ऑगस्ट २०२२ रोजी ज्येष्ठ सुघटन शल्य तज्ञ डॉ. रवीन थत्ते यांच्या उपस्थितीत ग्रंथाली लिसन या यु ट्युब चॅनलचा अनौपचारिक शुभारंभ झाला.
यावेळी मृण्मयी भजक, समीर कदम, अरूण जोशी, सुदेश हिंगलासपूरकर हे मान्यवर उपस्थित होते. डॉ. रवीन थत्ते यांनी ग्रंथालीच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.
अमेरिकेत होणाऱ्या बी. एम. एम. संमेलनामध्ये ग्रंथाली सलग १६व्यांदा सहभागी होत असून यावेळी अमेरिकेतील मराठी वाचकांना ग्रंथालीच्या ऑडिओ कथा श्रवणाचा आनंद घेता येणार आहे.
यथावकाश सर्वच रसिकांसाठी ही योजना उपलब्ध असेल. मृण्मयी भजक आणि समीर कदम यांनी आपले अनुभव सांगितले.