पुस्तक प्रकाशन 2022

वादळवाट

वादळवाट

शुक्रवार, 29 एप्रिल 2022 रोजी उस्मानाबाद येथे एम.डी. देशमुख लिखित ‘वादळवाट’ पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी लेखकाने मनोगतात, शिक्षण पंढरीचा वारकरी म्हणून कर्मयोग निभावताना आयुष्यातील विसाव्याच्या दिवसात ही साहित्यकृती वाचकांच्या हवाली,
ग्रंथालीच्या माध्यमातून पोचवता आली, याबद्दल आभार मानले.
ज्येष्ठ साहित्यिक भालेराव यांनी समीक्षणात्मक भाष्य करताना आचार्य अत्रे, आनंद यादव, चंद्रकात नलगे यांच्या लेखन कौशल्याची आठवण झाल्याचे तसेच लेखक उस्मानाबादमधील शैक्षणिक परिवर्तनाचे जनक म्हणून ओळखले जातात, हेदेखील ह्या साहित्यकृतीतून ज्ञात झाल्याचे म्हटले.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. पाटणे यांनी या साहित्यकृतीबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.
वादळवाट हे सुखदु:खाच्या अक्षरांनी बांधलेले मनोहर जीवनशिल्प आहे. वादळवाट हे समाजस्पर्शी आणि सत्यस्पर्शी वास्तवाचे मोहक आणि दाहक दर्शन घडवते.
संघर्षातून उत्कर्ष साधलेल्या ज्ञानसाधकाची वादळवाट ही यथोगाथा आहे.
ती प्रत्येकाने संग्रही ठेवावीच, अशी भावना व्यक्त केली.

Back to list